आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIFA 2015: Tinseltowners At Green Carpet, Have A Look At IIFA Technical Awards Winners

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IIFAच्या ग्रीन कार्पेटवर अवतरले बॉलिवूडचे लखलखते तारांगण, तुम्हीही पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस)
एन्टरटेन्मेंट डेस्कः आयफा 2015च्या रंगारंग सोहळ्याला मलेशियातील कुआलालंपुर येथे दणक्यात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी बॉलिवूडचे सेलिब्रिटी आयफाच्या टेक्निकल अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर अवतरले होते. बॉलिवूडच्या सौंदर्यवती सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, बिपाशा बसूसह अनेकजणी आयफाच्या ग्रीन कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसल्या. तर अर्जुन कपूर, अनिल कपूर, आर. माधवन, आयुष्मान खुराणा यांनीही ग्रीन कार्पेटवर अवतरुन सोहळ्याला चारचाँद लावले.
टेक्निकल अवॉर्ड्समध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या 'हैदर' सिनेमाचा बोलबाला राहिला. शाहिद-श्रद्धा कपूर स्टारर 'हैदर'ने सहा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. एक नजर टाकुया टेक्निकल अवॉर्ड्सच्या विजेत्यांवर...
अवॉर्डचे नावविजेतेफिल्म
स्पेशल इफेक्ट्स (व्हिजुअल)रूपल रावल (प्राइम फोकस)किक
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसुभ्रत चक्रवर्ती आणि अमित रेहैदर
बेस्ट साउंड डिझाइनशाजिथ कोयरीहैदर
बेस्ट साउंड रेकॉर्डिंगएरिक पिल्लई (तेरी गलियां)एक विलेन
बेस्ट मेक-अपप्रीतिशील सिंह आणि क्लोवर वूटनहैदर
बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनिंगडॉली अहलूवालियाहैदर
बेस्ट साउंड मिक्सिंगदेबजीत चांगमईहैदर
बेस्ट अॅक्शनपरवेज शेख आणि अँडी आर्मस्ट्रॉन्गबँग-बँग
बेस्ट कोरिओग्राफीअहमद खान (जुम्मे की रात)किक
बेस्ट स्क्रीनप्लेविकास बहल, चैताली परमार, परवेश शेखक्वीन
बेस्ट डायलॉग्सअभिजात जोशी आणि राजकुमार हिरानीपीके
बेस्ट बॅकग्राउंड स्कोरविशाल भारद्वाजहैदर
बेस्ट सिनेमेटोग्राफीविनोद प्रधान2 स्टेट्स
बेस्ट एडिटिंगअनुराग कश्यप आणि अभिजीत कोकाटेक्वीन
16 वा आयफा अवॉर्ड्स सोहळा 5 ते 7 जून याकाळात मलेशियातील कुआलालंपूर येथे पार पडतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ग्रीन कार्पेटवर अवतरलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...