आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टरच्या बर्थ डे पार्टीत पोहोचले शाहरूख, दीपिकासह अनेक सेलिब्रिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्थडे पार्टीत पोहोचलेला शाहरुख खान आणि दुसऱ्या फोटोत मुलगी अदासह इम्तियाज अली. - Divya Marathi
बर्थडे पार्टीत पोहोचलेला शाहरुख खान आणि दुसऱ्या फोटोत मुलगी अदासह इम्तियाज अली.
मुंबई - शुक्रवारी निर्माता दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 46व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्याच्या अपकमिंग 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटात काम करणारा शाहरुख खानही पोहोचला होता. यावेळी इम्तियाजने फॅमिली मेंबर्स आणि सेलेब्सच्या उपस्थितीत केक कापला. तसेच मीडियासमोर शाहरुख खान त्याला केप भरवतानाही दिसला. पार्टीत इम्तियाजची मुलगी अदा गॉर्जियस लूकमध्ये दिसली. 

हे सेल्ब्सही होते उपस्थित.. 
- इम्तियाजच्या पार्टीमध्ये दीपिका पदुकोणही पोहोचली होती. दीपिकाने यावेळी शाइनी व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्स परिधान केली होती. 
- पार्टीमध्ये आलिया भट विचित्र ड्रेसमध्ये झळकली. 
- तिने स्किन कलरच्या स्पेगेटी टॉपबरोबर ब्लू एक्स्ट्रा रिप्ड जीन्स परिधान केली होती. त्यावर पिवळ्या रंगाचा लाँग होता. त्यामुळे तिचा ड्रेस विचित्र दिसत होता. 
- दीपिका आलिया शिवाय रणबीर कपूर, राजकुमार हिराणी, तनिषा मुखर्जी आणि उपेन पटेलही उपस्थित होता. 

पुढील 8 स्लाइड्सवर पाहा, इम्तियाजच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS..