आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच रॅम्पवर अवतरली सुनील शेट्टीची मुलगी, सूरज पंचोलीसुध्दा दिसला सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅम्पवर अथिया शेट्टी सूरज पांचोलीसोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री दिल्लीमध्ये चालू असलेल्या इंडिया ब्राइडल फॅशन वीक (IBFW)मध्ये दिसली. यादरम्यान तिने आदित्य पांचोलीला मुलगा सूरज पांचोलीसोबत रॅम्प वॉक केला. दोघांनी हा रॅम्प वॉक डिझाइनर फाल्गुनी शाणेसाठी केला. अथियाने यावेळी ब्लॅक गाऊन परिधान केलेला होता, तसेच सूरज ब्लॅक सूटमध्ये दिसला.
अथिया आणि सूरज यांचा फॅशन शोसाठी पहिला रॅम्प वॉक होता. पहिल्याच अनुभव शेअर करताना अथिया सांगते, 'मी थोडी नर्व्हस होते, परंतु बेस्ट देण्याचा प्रयत्न केला.' तसेच सूरज सांगतो, 'हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दोन मिनीट होते.'
अथिया आणि सूरज सलमान खान प्रॉडक्शनच्या 'हीरो' सिनेमातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण करत आहेत. निखिल अडवाणीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा सिनेमा 11 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, IBFWदरम्यान सूरज आणि अथियाचे काही PHOTOS...