आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर थिरकले \'बाजीराव\'-\'दिलवाले\', वेगवेगळ्या रंगाच्या सँडलमध्ये दिसली आलिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह, शाहरुख खान, सलमान खान, हर्षाली मल्होत्रा, आलिया भट - Divya Marathi
रणवीर सिंह, शाहरुख खान, सलमान खान, हर्षाली मल्होत्रा, आलिया भट
मुंबईः 61 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, रेखा, दीपिका पदुकोण यांच्यासह बी टाऊनचे अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. इव्हेंटमध्ये रणवीर-दीपिका स्टारर 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाने तब्बल नऊ अवॉर्ड्स आपल्या नावी केले. (वाचा, फिल्मफेअर अवॉर्ड्सची Winner List)
'मल्हारी...' गाण्यावर थिरकले शाहरुख-रणवीर
'बाजीराव मस्तानी' या सिनेमात बाजीरावांची भूमिका वठवणारा अभिनेता रणवीर सिंह या इव्हेंटमध्ये शाहरुख खानसोबत स्टेजवर थिरकताना दिसला. या दोघांनीही बाजीराव मस्तानीतील मल्हारी गाण्यावर ठेका धरला होता. 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 18 डिसेंबरला रिलीज झाले होते. मात्र कलेक्शनमध्ये 'दिलवाले'पेक्षा 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा वरचढ ठरला. (पाहा, रेड कार्पेटवरील नजारा)
वेगवेगळ्या रंगाच्या सँडल्समध्ये दिसली आलिया...
आलिया भट फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर दिसली नाही. मात्र तिने इव्हेंटमधील एक इनसाइड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती डिझायनर सचिन अँड बाबीच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली. रंजक बाब म्हणजे या ड्रेसवर तिने वेगवेगळ्या रंगाच्या सँडल्स घातल्या. (पाहा. फिल्मफेअर अवॉर्ड्सचा रेड कार्पेटवरील नजारा)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, Filmfare Awards चे Inside Photos...