आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Bipasha Basu Birthday Celebration

बिपाशाच्या फॅमिलीला भेटून स्वत:ला लकी समजतो करण, लवकरच करणार लग्न?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिदिशा बसु, बिपाशा बसु, ममता बसु, करण सिंह ग्रोवर - Divya Marathi
बिदिशा बसु, बिपाशा बसु, ममता बसु, करण सिंह ग्रोवर
7 जानेवारीला बिपाशा बसुने 37वा वाढदिवस मालदीवमध्ये सेलिब्रेट केला. आठवडाभर सुरु असलेल्या या सेलिब्रेशनमध्ये 'बॉयफ्रेंड' करण सिंह ग्रोवर, फॅमिली मेंबर्स, कजिन्स आणि फ्रेंड्स सामील झाले होते. पार्टीचे काही फोटो बिप्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की बिप्सचा हा बर्थडे खूपच खास होता.
बिपाशाच्या कुटुंबीयांना भेटला करण...
सोमवारी (11 जानेवारी) करण सिंह ग्रोवरने एक खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले, 'The most important night of my life...In the midst of angels...Lucky me...'. या फोटोमध्ये बिपाशासोबत तिची आई ममता आणि बहीण बिदिशा दिसत आहेत. यांना भेटून करण स्वत:ला नशीबवान समजतो. 2015मध्ये आलेल्या 'अलोन' सिनेमादरम्यान करण-बिपाशाची जवळीक वाढली होती. तेव्हापासून दोघे सोबत असतात. असेही म्हटले जाते, की बिपाशामुळे करणने पत्नी जेनिफर विंगेटसोबत घटस्फोट घेतला. बातम्यांनुसार, बिपाशा आणि करण लग्न करण्याचा निर्णय घेणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा बसुच्या बर्थडे सेलिब्रेशनचे Inside Photos...