मुंबईः रविवारी (16 ऑगस्ट) अभिनेता सैफ अली खानने
आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने करीनाने त्यांच्या राहत्या घरी फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी एक पार्टी आयोजित केली होती. या बर्थड बॅशनची काही छायाचित्रे या स्टार्सनी आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केली आहेत.
अभिनेत्री करिश्मा कपूरने सैफसोबतचे एक छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. यामध्ये सैफ तिला किस करताना दिसतोय. तर आणखी एका छायाचित्रात करिश्मा कपूर, करीना कपूर खान, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा स्टनिंग अंदाजात पोज देताना दिसत आहेत. पार्टीत सोहा अली खान, कुणाल खेमू, अरबाज खान, मलायकाक अरोरा खान, मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट, कुणाल कपूर, जहान पृथ्वीराज कपूर हे सेलेब्स सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सैफ अली खानच्या बर्थडे बॅशची खास छायाचित्रे...