आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानीच्या पार्टीत असीन पोहोचली होणा-या नव-यासोबत, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द बिझनेसमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी (11 डिसेंबर) आपल्या मुंबई स्थित अँटिलिया घरी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी क्रिकेटर हरभजन सिंह आणि रोहित शर्मा यांच्या लग्नानिमित्त ठेवण्यात आली होती. पार्टीत फक्त क्रिकेट क्षेत्रातीलच नव्हे तर उद्योग आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार पोहोचले होते.
बॉलिवूडमधून ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, सुष्मिता सेन, आलिया भट्ट, श्रीदेवी. सुनील शेट्टीची लेक अथिया, मनीष मल्होत्रा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स पोहोचले होते. विशेष म्हणजे या पार्टीत अभिनेत्री असिन होणारा नवरा आणि मायक्रोमॅक्सचा को-फाउंडर राहुल शर्मासोबत पोहोचली होती.
पार्टीत तर जंगी होतीच, मात्र पार्टीत सेल्फीचा क्लिक झाले नसतील असे होऊच शकत नाही. प्रत्येक पार्टीप्रमाणेच या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सनी खूप सेल्फी घेतले. या पार्टीचे काही इनसाइड फोटो मुकेश अंबानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तुम्हीही या पार्टीत झालेली धमाल-मस्ती पाहू शकता. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा INSIDE PHOTOS...