आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियासोबत जॅकलिनने साजरा केला बर्थडे, अक्षय-सिद्धार्थला या अंदाजात भरवला केक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसने मंगळवारी नवी दिल्लीत आपल्या आगामी 'ब्रदर्स' या सिनेमाचे प्रमोशन केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत जॅकलिनने आपल्या वाढदिवसही साजरा केला. 11 ऑगस्ट रोजी वयाची तिशी पूर्ण करणा-या श्रीलंकन ब्युटी जॅकलिनने मीडियासोबत केक कापला. यावेळी मंचावर तिच्यासोबत ब्रदर्सचे तिचे को-स्टार अक्षय आणि सिद्धार्थ मल्होत्रा मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
यावेळी जॅकलिन म्हणाली, ''मी आज आनंदी आहे, कारण वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा मी काम करते. यापेक्षा अधिक काही स्पेशल असूच शकत नाही. माझ्या या दोन मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्याने मी अधिकच आनंदी आहे.''

यावेळी जॅकलिनने वॉयलेट क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. तर अक्षय ब्लू टी शर्ट आणि ग्रे पँटमध्ये दिसला. सिद्धार्थने व्हाइट टीशर्ट, ब्लू जॅकेट आणि डेनिम्स कॅरी केले होते. करण मल्होत्रा दिग्दर्शित ब्रदर्स हा सिनेमा येत्या 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात तिघांव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिल्ली प्रमोशनदरम्यान क्लिक झालेली अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...