आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद जाफरीच्या ईद पार्टीत पोहोचले सुनील शेट्टी, नेहा धुपिया आणि अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - जावेद जाफरी, नेहा धुपिया आणि सुनील शेट्टी - Divya Marathi
डावीकडून - जावेद जाफरी, नेहा धुपिया आणि सुनील शेट्टी

मुंबईः बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांनी शनिवारी आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी ईद पार्टी आयोजित केली होती. अंधेरी येथे आयोजित या पार्टीत सुनिल शेट्टी, ऋषी कपूर, नेहा धुपिया, अभिनव कश्यप, संजय मिश्रा आणि शाद अलीसोबत अनेक सेलेब्स पोहोचले होते.
सूरमा भोपाली या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते जगदीप यांचे जावेद सुपुत्र आहेत. त्यांनी 'मेरी जंग' (1985), 'फायर' (1996), 'हनुमान' (1998), 'सलाम नमस्ते' (2005), 'धमाल' (2007), 'सिंह इज किंग' (2008), '3 इडियट्स' (2009) आणि 'वार छोड़ न यार'(2011) या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. हृतिक रोशन आणि कतरिना कैफ स्टारर 'बँग बँग'मध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्यांच्या आगामी 'टोटल धमाल' या सिनेमाचे सध्या प्री प्रॉडक्शन सुरु आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जावेद यांच्या पार्टीतील छायाचित्रे...