आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या लग्नानंतर कबीरने दिली 70वी बर्थडे पार्टी, पोहोचले अनेक बॉलिवूड सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे पल्लवी शारदा, कबीर बेदी, परवीन दुसांज आणि इला अरुण - Divya Marathi
डावीकडे पल्लवी शारदा, कबीर बेदी, परवीन दुसांज आणि इला अरुण
मुंबई- 16 जानेवारीला बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने 70वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक प्रसिध्द कलाकार पोहोचले होते. प्रेम चोप्रा, इला अरुण, चेतन हंसराज, गुलशन ग्रोवर, अरुणोदय सिंह, राहूल भट, पल्लवी शारदा, अकबर खान, लैला कान आणि एड गुरु प्रल्हाद कक्कडसह अनेक सेलेब्स यावेळी दिसले.
बर्थडे पार्टीच्या एक दिवस आधी केले लग्न...
कबीर आपल्या बर्थडे पार्टीत ब्रिटनची रहिवासी आणि पत्नी परवीनसोबत आला होता. त्याने बर्थडे पार्टीच्या एक दिवसापूर्वीच परवीनसोबत लग्न केले. परवीन आणि कबीर अनेक वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.
पार्टीत सर्व पाहूण्यांनी कबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परवीनने वेगळ्या अंदाजात कबीरला शुभेच्छा दिल्या. मीडियासोबत बातचीत करताना कबीरने सांगितले, की तो भारतात परत आल्याने खूप आनंदी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीचे काही फोटो...