आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana, Madhavan And Other Celebs At TWMR Special Screening

TWMRच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी सोनाली-कंगना, पत्नीसोबत दिसला आर माधवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाली बेंद्रे, कंगना राणावत, आर माधवन पत्नी सरिता बिर्जेसोबत)
मुंबई- 22 मे रोजी रिलीज होणा-या 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग काल (19 मे) मुंबईच्या एका थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. स्क्रिनिंगवेळी अनेक दिवसांनंतर दिसलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅमे-यात क्लिक झाली. इव्हेंटमध्ये मुख्य कलाकार कंगना राणावत आणि आर माधवनसुध्दा होते. यावेळी आर माधवनची पत्नी सरिता बर्जेसुध्दा स्पॉट झाली.
स्क्रिनिंगदरम्यान कंगना डिझाइनर Aquilano.Rimondiच्या आऊटफिटमध्ये पोहोचली होती. तिने प्रिंटेड ब्लेजर आणि स्कर्टसोबत ब्लू लाँग शीर ब्लाऊज कॅरी केलेले होते.
स्क्रिनिंगमध्ये इरफान खान, निर्माते विधु विनोद चोप्रा, दिग्दर्शक आर. बल्कि, निर्माती कृषिका लुल्लासह अनेक स्टार्स सामील झाले.
हा सिनेमा 2011मध्ये आलेल्या 'तनु वेड्स मनु'चा सीक्वल आहे. एरोज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार होणा-या या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...