आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती करताच 'क्वीन' कंगनाने काढला असा पळ, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपोर्टरचा प्रश्न ऐकताच कंगना रनोटने तेथून असा पळ काढला - Divya Marathi
रिपोर्टरचा प्रश्न ऐकताच कंगना रनोटने तेथून असा पळ काढला

मुंबईः बॉलिवूडची क्वीन कंगना रनोट सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 'की अँड का'च्या सक्सेस पार्टीत पोहोचली होती. यावेळी मीडियाशी बोलताना कंगनाने करीनाच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले. यावेळी एका पत्रकाराने कंगनाला प्रश्न केला, की इतर अभिनेत्री आपल्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींचे कधीच कौतुक करताना दिसत नाही, मात्र तू उघडपणे करीनाचे कौतुक करत आहे. याचे उत्तर देताना कंगना म्हणाली, जो कौतुकास पात्र आहे, त्याचे मी आवर्जुन कौतुक करत असते.

जेव्हा कंगनाने काढला पळ...
कंगनाचे हे उत्तर ऐकल्यानंतर पत्रकार तिला आणखी एक प्रश्न विचारणार तोच कंगनाने तेथून निघून जाणे पसंत केले. यावेळी पत्रकार तिच्यामागे पळताना दिसला. कंगनाचे अशापद्धतीने तेथून निघून जाणे अतिशय हास्यास्पद ठरले.
या स्टार्सची होती उपस्थिती...
मुंबईतील ओलिव्ह रेस्तराँमध्ये आयोजित या सक्सेस पार्टीत सिनेमातील लीड स्टार करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह दिग्दर्शक आर. बाल्की उपस्थित होते. याशिवाय बाल्कींची पत्नी आणि दिग्दर्शिका गौरी शिंदे, संगीतकार जोडी मीत ब्रदर्स, अक्षरा हसन, गौतम गुलाटी, कबीर बेदीसह अनेक स्टार्स यावेळी दिसले. 1 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या की अँड का या सिनेमाने रिलीजच्या दोन आठवड्यांत 45 कोटींचा गल्ला जमवला आहे. (वाचा 'की अँड का'चा रिव्ह्यू...)

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, की अँड काच्या सक्सेस पार्टीत उपस्थित स्टार्सची छायाचित्रे...