आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPOTTED: राधिका, कंगनासह या सेलिब्रिटींनी अटेंड केले हॉलिवूड सिनेमाचे स्क्रिनिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राधिका आपटे, कंगना रनोट आणि तब्बू)
मुंबईः अभिनेत्री राधिका आपटे, कंगना रनोट आणि तब्बू गुरुवारी रात्री मुंबईतील लाइट बॉक्स थिएटरमध्ये पोहोचल्या होत्या. निमित्त होते अभिनेता इरफान खानने आयोजित केलल्या 'एमी' या ब्रिटीश डॉक्युमेंट्रीच्या स्पेशल स्क्रिनिंगचे.
यावेळी कंगना कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने ब्लू डेनिम्ससोबत पिंक टँक टॉप कॅरी केले होते. मीडियासोबत बोलताना कंगनाना सांगितले, की हा सिनेमा बघण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. अभिनेता इरफान खान, रजनीश दुग्गल, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्तेसोबत टीव्ही अभिनेता हितेन तेजवानी, त्याची पत्नी गौरी प्रधानसुद्धा स्क्रिनिंगला पोहोचली होती.
आसिफ कपाडिया दिग्दर्शित 'एमी' ही ब्रिटनमध्ये पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारी डॉक्युमेंट्री आहे. हा शॉर्ट फिल्म पॉप सिंगर एमी वाइनहाउसच्या आयुष्यावर आधारित असून वयाच्या 27 व्या वर्षी तिचे निधन झाले होते. 10 जुलै रोजी ही डॉक्युमेंट्री भारतात रिलीज झाली आहे.
पुढे पाहा, 'एमी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...