आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mother of All Bashes: करणच्या पार्टीत अवतरले तारांगण, 100 हून अधिक सेलेब्स आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी अवघे तारांगण अवतरले होते. गुरुवारी करणने त्याच्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ग्रँड पार्टी होस्ट केली. या पार्टीमध्ये संपूर्ण बॉलिवूडकर अवतरले होते. करण यावर्षी दोन मुलांचा बाप बनला आहे. त्यामुळे यंदाच्या वाढदिवसाचा खास सेलिब्रेशन करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला होता. त्यामुळेच त्याने ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. 
PICS: करणच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचले सिद्धार्थ-वरुण, हे सेलेब्सही दिसले जोडीदारासोबत
 

करणला नेहमीच पार्टी आयोजित करून इंडस्ट्रीतील मित्रांबरोबर एन्जॉय करायला आवडत असते. त्यात त्याच्या वाढदिवसासारखे निमित्त असल्यावर तो ही संधी कशी दवडणार. त्यात त्याची जुळी मुले रुही आणि यश देखिल त्याचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्याच्याबरोबर असल्याने त्याने यंदा मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला.  करणच्या पार्टीत दीपिका-कतरिनासह पोहोचल्या त्याच्या आगामी 'हीरोईन्स'
 
 
कोणकोण पोहोचले पार्टीत...  
करणच्या या शानदार पार्टीत बॉलिवूडमधून 100 हून अधिक सेलिब्रिटी एका छताखाली आले होते. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, रितेश देशमुख, संजय दत्त, मान्यता दत्त, सुशांत सिंह राजपूत, आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव, चंकी पांडे, वरुण धवन, हर्षवर्धन कपूर, सोनम कपूर, सोनाली बेंद्रे, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, किर्ती सेनन, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सोफी चौधरी, श्वेता बच्चन नंदा, एकता कपूर, आदिती राव हैदरी, हृतिक रोशन, मलायका अरोरा, अमृता अरोरासह अनेक सेलिब्रिटी पार्टीत  पोहोचले. अभिनेता शाहरुख खानसुद्धा त्याची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यनसोबत पार्टीत सहभागी झाला होता.  

पुढील स्लाईड्सवर बघा, करण जोहरच्या लॅव्हिश बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...