आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Bash: Soha Ali Khan Was Also Present At The Party

बहीण करीनाच्या पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचला रणबीर, या सेलिब्रिटींनीही एन्जॉय केली पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून - रितेश-जेनेलिया देशमुख, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अर्जुन कपूर - Divya Marathi
डावीकडून - रितेश-जेनेलिया देशमुख, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अर्जुन कपूर
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने 25 जुलै रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी एका छोट्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील तिचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. करीनाच्या वांद्रास्थित घरी ही पार्टी होती.
या पार्टीत करीनाचा चुलत भाऊ आणि अभिनेता रणबीर कपूर त्याची लिव्ह इन पार्टनर कतरिना कैफसोबत सहभागी झाला होता. याशिवाय अर्जुन कपूर, रितेश आणि जेनेलिया देशमुख, कुणाल खेमू, सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमू या पार्टीत सहभागी झाले होते.
करीनाचा नवरा सैफ अली खानच्या आगामी 'फँटम' या सिनेमाचा ट्रेलरसुद्धा 25 जुलै रोजीच रिलीज झाला. या सिनेमात कतरिना कैफ सैफसोबत झळकणार आहे. कबीर खान दिग्दर्शिक 'फँटम' हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी रिलीज होणारेय.
करीना कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. या सिनेमाने जवळजवळ 300 कोटींच्या घरात बिझनेस केला आहे. सिनेमाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी करीनाने ही पार्टी आयोजित केल्याचे सूत्रांकडून समजते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करीना कपूरच्या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...