आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Kareena Kapoor Celebrated Birthday At Pataudi Palace

पतौडी पॅलेसमध्ये करीनाचा B\'day, मध्यरात्रीपर्यंत चालली वाइन-सेल्फीची धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूर, अमृता अरोरा लडक, करीना कपूर खान आणि मलायका अरोरा खान - Divya Marathi
करिश्मा कपूर, अमृता अरोरा लडक, करीना कपूर खान आणि मलायका अरोरा खान
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान 35 वर्षांची झाली आहे. तिच्या बर्थडेसाठी पती सैफ खूप उत्साही आहे. रविवार रात्री (20 सप्टेंबर) पतौडी पॅलेसमध्ये सैफने स्पेशल पार्टी होस्ट केली होती, त्यामध्ये करीनाची बहीण करिश्मा कपूर, बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा लडक, मलायका अरोरा खान, मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट आणि फॅमिली फ्रेंड मशहूर अमरोहीसह अनेक सेलेब्स समील झाले होते.
कथितरित्या पतौडी पॅलेसच्या गार्डनमध्ये पार्टीची सुरुवात कॅजुअल लंचसोबत झाली. त्यानंतर वाइन, सेल्फी आणि धमला-मस्ती चालू झाली. बातम्यांनुसार, पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. यादरम्यान करीनाने शॉर्ट पँट आणि टँक टॉप परिधान केला होता.
करीना सध्या 'का अँड की' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामध्ये अर्जुन कपूर तिच्या अपोझिट आहे. शिवाय, बर्थडेच्या काही दिवसांपूर्वी 'खुदा के लिए', 'बोल' आणि 'उर्दू ड्रामा'सारख्या अँग्लोपाकिस्तानी सिनेमे केलेल्या पाकिस्तानी दिग्दर्शक शोएब मन्सूर यांनी तिला आपल्या आगामी प्रोजेक्टची ऑफर दिली आहे. हा एक हीरोइन-सेंट्रिक सिनेमा असेल.मा६ अद्याप करीना हे प्रोजेक्ट साइन केलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, पार्टीदरम्यान करीना, सैफ, अमृता, करिश्मा आणि इतर सेलेब्सचे फोटो...