आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही मुलींसोबत रणधीर कपूर यांनी सेलिब्रेट केला B\'day, रेखा-अमिताभसुद्धा पोहोचले पार्टीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा, अमिताभ, करिश्मा आणि करीना यांच्यासोबत रणधीर कपूर - Divya Marathi
रेखा, अमिताभ, करिश्मा आणि करीना यांच्यासोबत रणधीर कपूर

मुंबई : बॉलिवूड अॅक्टर रणधीर कपूर यांनी 15 फेब्रुवारी रोजी वयाची 70 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने बुधवारी रात्री एका ग्रॅण्ड बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वडिलांच्या बर्थडेचे इनसाइड फोटोज करिश्मा कपूरने शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये रणधीर त्यांच्या दोन्ही मुली करिश्मा-करीना आणि जावई सैफ अली खानसोबत दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोसोबत करिश्माने लिहिले,  "#DaddyKaBirthdayAya ~ Randhir Kapoor's birthday party! Oh too much good looking people in one frame though! Well selfie goals."
 
रेखा-अमिताभसह पार्टीत पोहोचले हे सेलेब्स...
रणधीर कपूर यांच्या पत्नी बबिता, दोन्ही मुली करिश्मा आणि करीना, जावई सैफ अली खान यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स पार्टीत सहभागी झाले होते.  अमिताभ बच्चन, रेखा, ऋषी कपूर, नीतू कपूर, डायरेक्टर श्याम बेनेगल, जितेंद्र, राकेश रोशन, राइटर सलीम खान पार्टीतील गेस्ट होते. याशिवाय रणबीर कपूर, अमीषा पटेल, मलायका अरोरा खान, अमृता राव, अरमान जैन, सिंगर अदनान सामी हे सेलिब्रिटीही पार्टीत सहभागी झाले होते. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीचे Photos...
बातम्या आणखी आहेत...