आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Pix: पार्टीत BF सोबत करिश्माने केले एन्जॉय, नीतू सिंगच्या हातात दिसला दारुचा ग्लास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांनी नुकताच त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांच्या लेकी करिश्मा आणि करीना कपूर यांनी एका ग्रॅण्ड बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अमिताभ बच्चन, रेखा यांच्यापासून ते ऋषी कपूर, राकेश रोशन, पूनम ढिल्लन, सलीम खान, अमिषा पटेल, मलायका अरोरा खानसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या पार्टीचे काही फोटोज करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. फोटो शेअर करुन तिने लिहिले, "#DaddyKaBirthdayAya ~ Randhir Kapoor's birthday party! Oh too much good looking people in one frame though! Well selfie goals."
 
पार्टीत करिश्माच्या बॉयफ्रेंडची उपस्थिती... 
करिश्मा कपूरचा बहुचर्चित प्रियकर संदीप तोश्नीवाल या पार्टीत उपस्थित होता. पार्टीत आलेल्या पाहुण्यांसोबत करिश्मा संदीपची ओळख करुन देताना दिसली. संदीप आणि करिश्मा पूर्णवेळ पार्टीत सोबत होते. करिश्माची आई बबितासुद्धा संदीपसोबत गप्पा मारताना दिसली. 
 
करिश्मासाठी संदीपने पत्नीला ठरवले मनोरुग्ण...  
करिश्मा कपूरने संजय कूपरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता करिश्माचा कथित प्रियकर म्हणजे तोश्नीवाल त्याच्या पत्नीपासून विभक्त होण्याच्या तयारीला लागला आहे. तोश्नीवालने पत्नी अर्शिता मनोरुग्ण असल्याचे सांगत तिच्यापासून वेगळे होण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कोर्टात त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचे समजते. संदीप तोश्नीवाल आणि अर्शिता यांना 6 आणि 11 वर्षाच्या दोन मुली आहेत. गेल्या काही काळापासून करिश्मा आणि संदीप एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असून संजय कपूरसोबतच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळानंतर करिश्माला संदीपमध्ये चांगला मित्र मिळाला असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांच्या वाढत जाणाऱ्या जवळकीमुळे लवकरच दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येणार असल्याची माहिती देखील चर्चेचा विषय ठरली होती. करिश्मा आणि संदीप त्यांच्या नात्याला एक नवे वळण देऊ इच्छित आहेत. त्यामुळेच या दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात होते. यासाठी संदीप मुंबईतील वांद्रे येथे एका प्रशस्त घराच्या शोधात असल्याची माहिती देखील चर्चा होती. संदीपने सध्या त्याच्या पत्नीकडून घटस्फोट घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तोश्नीवालच्या वकील तोबन इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायाने डॉक्टर असणारी अर्शिता मानसिक आजाराने त्रस्त आहे. मानसिक संतुलन ढासळल्याने ती अनेकदा आक्रमक होते. ती मानसिक रुग्ण असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. मानसिक रुग्ण असल्याची निदान झाल्यानंतर अर्शिताने उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तोश्नीवाल तिच्यापासून विभक्त होणार असल्याचे ते म्हणाले.   

रणबीरची आई दिसली ड्रिंक करताना...
या पार्टीत कपूर फॅमिलीतील जवळजवळ सर्वच सदस्य हजर होते. रणबीर कपूरचे आईवडील आणि रणधीर कपूरचे धाकटे भाऊ अर्थातच ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नीतू सिंग पार्टीच उपस्थित होत्या. यावेळी नीतू सिंग ड्रिंक करताना दिसल्या. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीचे Inside Photos... 
बातम्या आणखी आहेत...