आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KJo, Gauri Khan, Neetu Kapoor, Manish Malhotra At Others At Venice Wedding

VIDEO : शाहरुखच्या पत्नीसोबत करण जोहरने लावले ठुमके, तुम्हीही पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौरी खान आणि करण जोहर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः फिल्ममेकर करण जोहर त्याची बेस्ट फ्रेंड आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खानसोबत वेनिस येथे एका हाय प्रोफाइल वेडिंगमध्ये सहभागी झाला होता. या जोडीने लग्नात एकत्र ठुमकेसुद्धा लावले. सिंगर कनिका कपूरने गायलेल्या 'चिट्टियां-कलाइयां' या गाण्यावर करण आणि गौरी थिरकताना दिसले. या पार्टीत आकर्षणाचे केंद्रबिंदू करण जोहरच होता. करणने मंचावर धरलेला ताल तुम्ही व्हिडिओत बघू शकता.
13 जून रोजी लंडन बेस्ट उद्योजक किमी आणि पामेला ग्रोवरचा मुलगा अश्विन रिया खिलनानीसोबत लग्नगाठीत अडकला. वेनिस येथे हा शाही लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. चार दिवस चाललेल्या या हाय प्रोफाइल वेडिंगमध्ये करण जोहर आणि गौरी खान यांच्याव्यतिरिक्त नीतू कपूर, श्वेता बच्चन नंदा, जया बच्चन, डिझायनर मनीष मल्होत्रा, सोफी चौधरीसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते. स्टार्सनी आपल्या सोशल अकाउंटवर वेनिसची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वेनिसमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...