आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्पवर अवतरली बेबो, व्हाइट ड्रेसमध्ये दिसली सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः मुलगा तैमूर अली खानच्या जन्माच्या 46 दिवसांनी करीना कपूर खान रॅम्पवर अवतरली. निमित्त होते, लॅक्म फॅशन वीक 2017चे. या शोच्या ग्रॅण्ड फिनालेत करीना डिझायनर अनिता डोंगरची शो-स्टॉपर ठरली होती. रविवारी झालेल्या या इव्हेंटमध्ये करीनाने लाँग व्हाइट गोल्डन ड्रेससोबत फ्लोर लेन्थ गोल्डन जॅकेट कॅरी केले होते. सिंपल मेकअपमध्ये करीना अतिशय सुंदर दिसली. करीना अगदी गरोदरपणापासून ते गरोदरपणनंतरही विविध रुपांमध्ये सर्वांसमोर येतेयं.
 
सर्वच गोष्टींमध्ये साधला समतोल...
तैमुरच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा रॅम्वर परतली आहे,  सर्व गोष्टींचा मेळ तू कसा साधत आहेस? असा प्रश्न करीनाला विचारला असता ती म्हणली, ‘मी नेहमीच सर्व गोष्टींमध्ये समतोल राखला आहे. या क्षेत्रात पुनरागमन करणं खुपच छान आहे. मी हे गरोदरपणातही म्हटले होते, की हा काळ काही आजारपणाचा काळ नव्हता. मी रॅम्पवर आज चालले आहे आणि यापुढेही चालेन कारण मला या सर्व गोष्टी आवडतात. मला माहितीये की काही जणांना असे करणे कठिण जाते. त्यांना त्यांच्या बदललेल्या शरीराच्या बांध्याबद्दल संकोचलेपणा वाटतो. पण, रॅम्पवर चालण्यासाठी आत्मविश्वास लागतो जो माझ्यात आहे.’ 

पुढील स्लाईड्सवर बघा, लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅण्ड फिनालेत क्लिक झालेले करीना आणि इतर सेलिब्रिटींचे Photos....
बातम्या आणखी आहेत...