आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल गँगसोबत न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करतेय सलमानची वहिनी, बघा हॉलिडे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सलमान खानची वहिनी आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खानने नेहमीच स्वतःला इंडिपेंडेंट वुमन म्हटले आहे. कामासोबत तिला फिरायची आवड आहे. सध्या मलायका आपल्या गर्ल गँगसोबत न्यूयॉर्कमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. येथे ती नाइट क्लब्समध्ये पार्टी आणि विविध पदार्थांची मजा अनुभवतेय. तिच्यासोबत सोफी चौधरीसुद्धा येथे हॉलिडे एन्जॉय करतेय. मलायका न्यूयॉर्क येथील फॅशन स्ट्रीट आणि फूड विशेष पसंत आहे. अरबाजपासून विभक्त होतेय मलायका...

- काही वर्षे डेटिंग केल्यानंतर मलायकाने 1998 मध्ये सलमानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. दोघांचा एक मुलगा असून अरहान हे त्याचे नाव आहे.
- 2016 च्या सुरुवातीपासूनच मलायका आणि अरबाज यांच्यात सारकाही आलबेल नसल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. मलायकाने खान कुटुंबीयांचे वांद्रा येथील घर सोडले आहे.
- आता ती तिचा 14 वर्षीय मुलगा अरहानसोबत खार येथील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे.
- अरबाज आणि मलायका यांनी विभक्त होत असल्याचे जाहिर केले आहे. ते म्हणाले, "होय हे खरे आहे. आम्ही दोघेही एक ब्रेक घेत आहोत. मात्र याचा अर्थ आमच्याविषयी कुणीही काहीही विचार करावा अशा होत नाही. आम्ही आमचे आयुष्य कुठे जात आहे, हे समजण्यासाठी हा ब्रेक घेत आहोत."

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मलायका अरोरा खानचे Vacation Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...