आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-हसबंडच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका, फोटोग्राफर्सना पोज देण्यास दिला नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानने 4 ऑगस्ट रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. अरबाजने त्याची पुर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरा आणि मेव्हणी अमृता अरोरासोबत आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या दोघींसोबत अरबाजने मुंबईतील एका रेस्तराँमध्ये एकत्र जेवण केले. रेस्तराँबाहेर पडताना मलायका आणि अमृता अरबाजसोबत दिसल्या. पण नेहमी कॅमे-यासमोर पोज देताना दिसणारी मलायका यावेळी मात्र  कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सना फोटोज क्लिक करण्यास मनाई करताना दिसली. 

सलमान होता अनुपस्थित... 
- अरबाजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या डिनर पार्टीत सलमान दिसला नाही.
- मलायकाने केवळ डिनर पार्टीला उपस्थितीच लावली नाही, तर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या.  
- मलायकाने अरबाजचा केकसोबतचा फोटो पोस्ट करुन कायम आनंदी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. 

पुढील स्लाईड्सवर बघा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...