आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतकार मीत ब्रदर्सच्या पार्टीत जमली सेलेब्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केक कापताना मनमीत सिंह - Divya Marathi
केक कापताना मनमीत सिंह

मुंबईः गुरुवारी प्रसिद्ध संगीतकार मनमीत सिंहने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्याच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाले होते. यामध्ये कायनात अरोरा, मेघना नायडू, शिबानी कश्यप, करिश्मा तन्ना, आकृती कक्कर, शान, विवियन डिसुजा, करणवीर बोहरा, भूषण कुमार आणि प्रभूदेवा या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
शिबानी कश्यपने मनमीतसाठी एक साँग डेडिकेट केले, तर दुसरीकडे दिग्दर्शक प्रभूदेवाने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग' या सिनेमातील गाण्यांसाठी मीत ब्रदर्सचे कौतुक केले.
मनमीत आणि त्याचा भाऊ हरमीत सिंह बॉलिवूडमध्ये मीत ब्रदर्स या नावाने प्रसिद्ध आहेत. या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमांना म्युझिक दिले आहेत. ‘हीरो’, ‘रॉय’, ‘किक’, ‘बॉस’, ‘एक पहेली लीला’ आणि ‘वेलकम बैक’ हे त्यांचे अलीकडचे सिनेमे आहेत. तर ‘सिंह इज ब्लिंग’हे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या पार्टीत क्लिक झालेली छायाचित्रे...