आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिर्झिया'च्या स्पेशल स्क्रिनिंगला श्रीदेवी-बोनींची मुलगी ठरली Center Of Attraction, बघा फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच मुंबईत 'मिर्झिया' या आगामी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या सिनेमातून अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. हर्षवर्धनचा पहिला सिनेमा बघण्यासाठी त्याचे काका अर्थातच बोनी कपूर पत्नी श्रीदेवी आणि थोरली मुलगी जान्हवीसोबत पोहोचले होते. शिवाय बोनी यांच्या मातोश्री निर्मल कपूर यासुद्धा आपल्या नातवाचा सिनेमा बघायला आवर्जुन उपस्थित होत्या. अनिल कपूरसुद्धा आपल्या मुलाचा सिनेमा बघायला पोहोचले होते.
कपूर फॅमिलीसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. फराह खान, नीतू सिंह, विशाल भारद्वाज, जॅकी भगनानीसह अनेक सेलेब्स यावेळी स्पॉट झाले. या सर्व सेलिब्रिटींमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरली. वन पीसमध्ये जान्हवी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली.

मिर्झिया हा सिनेमा 7 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होत असून हर्षवर्धनसोबत सयामी खेर ही अभिनेत्रीसुद्धा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'मिर्झिया'च्या स्पेशल स्क्रिनिंगला क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...