आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानींच्या पार्टीत हातात हात घालून पोहोचले दीपिका-रणवीर, बी टाऊन सेलेब्सची जमली मांदियाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गुरुवार रात्री मुकेश आणि नीता अंबानी यांनी त्यांची भाची इशिता सालगावकरच्या लग्नापूर्वी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडसोबतच क्रिडा, पॉलिटिक्स आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज पोहोचले होते. पार्टीत सर्वाधिक लक्ष वेधले ते रणवीर आणि दीपिका या जोडीने. ही जोडी एकाच कारमधून पार्टी स्थळी दाखल झाली. यावेळी दोघेही पूर्ण वेळ हातात हात घालून दिसले. अंबानींच्या पार्टीत दिसली सेलिब्रिटींची मांदियाळी...

मुकेश आणि नीता अंबानी यांनी होस्ट केलेल्या या पार्टीत मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी त्यांची पत्नी टीनासोबत पोहोचले. याशिवाय अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान पत्नी किरणसोबत, जॅकी श्रॉफ, अभिषेक-ऐश्वर्या, सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बहल, सानिया मिर्झा, लारा दत्ता, सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, कृती सेनन, आलिया भट, सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत, रवि शास्त्री, कुमारमंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, प्रफुल्ल पटेल हे या दिग्गजांनी त्यांच्या उपस्थितीने पार्टीची शोभा वाढवली.

मुकेश-अनिल अंबानींच्या बहिणीची मुलगी आहे इशिता
इशिता प्रसिद्ध बिजनेसमन दत्ताराज सालगावकर आणि दीप्ती सालगावकर यांची कन्या आहे. दीप्ती सालगावकर या धीरुभाई अंबानी यांच्या कन्या आणि अनिल-मुकेश यांच्या भगिनी आहेत. तर नीशल मोदी, ज्यांच्यासोबत इशिताचे लग्न ठरले आहे, ते प्रसिद्ध व्यावसायिका नीरव मोदीचे धाकटे बंधू आहेत. इशिता आणि नीशल यांचे लग्न येत्या 4 डिसेंबर रोजी गोव्यात होणार असून अंबानी आणि सालगावकर यांच्याकडे लगीनघाई सुरु झाली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा मुकेश-नीता अंबानी यांच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...