आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागार्जुनच्या मुलाचे 12 नोव्हेंबरला लग्नाचे रिसेप्शन, येथे होणार ग्रॅंड सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागार्जुन. नागा चैतन्य आणि समांथा. - Divya Marathi
नागार्जुन. नागा चैतन्य आणि समांथा.
मुंबई / हैदराबाद - साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा सध्या हनिमून ट्रिपवर आहेत. दरम्यान अशी माहिती आहे की नागार्जुन मुलाच्या लग्नाचे लवकरच रिसेप्शन देणार आहे. 12 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होईल. 6 ऑक्टोबरला नागा चैतन्य आणि समांथाचे आधी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रीती-रिवाजानुसार लग्न झाले होते. समांथा ही ख्रिश्चन फॅमिलीतून आली आहे. 
 
येथे होणार रिसेप्शन
- हैदराबादमधील मधापूर येथील एन कन्व्हेंशन सेंटरमध्ये नागा चैतन्य आणि समांथा यांची रिसेप्शन पार्टी होणार आहे. यामध्ये टॉलिवूडसोबत (तेलुगू फिल्म इंडस्ट्री) साऊथचे अनेक स्टार्स येणार आहे. 
- विशेष म्हणजे याआधी नागा चैतन्यची आई लक्ष्मी दग्गुबतीने ऑक्टोबरमध्ये चेन्नईत एक रिसेप्शन दिले होते. लक्ष्मी चेन्नईमध्ये राहाते. 
 
मुलाच्या लग्नात असा होता नागार्जुनचा लुक...
बातम्या आणखी आहेत...