आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 PICS: इव्हेंटमध्ये मामी ऐश्वर्यासोबत पोहोचली नव्या नवेली, दिशासह दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या नवेली नंदा, ऐश्वर्या राय बच्चन आणि दिशा पाटनी - Divya Marathi
नव्या नवेली नंदा, ऐश्वर्या राय बच्चन आणि दिशा पाटनी
 
अलीकडेच मुंबईत व्होग ब्युटी अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात सोहळ्यात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. डिझायनर मोनिशा जयसिंह यांनी डिझाइन केलेल्या आइस ब्लू गाऊनमध्ये नव्याचा लूक अतिशय आकर्षक दिसला. या इव्हेंटमध्ये नव्यासोबत तिची आई श्वेता बच्चन नंदा, आजी-आजोबा जया आणि अमिताभ बच्चन यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी श्वेता बच्चन नंदाने यलो कलरचा मोकाचीनो गाऊन कॅरी केला होता. नव्या, श्वेता आणि जया बच्चन या तिघीही व्होगच्या स्पेशल गेस्ट होत्या. या तिघीजणी व्होग मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्या आहेत. 
 
ऐश्वर्यासह या सेलिब्रिटींची होती उपस्थिती...  
- व्होग ब्यूटी अवॉर्ड्स सोहळ्याला ऐश्वर्या राय बच्चन हिचीसुद्धा खास उपस्थिती होती. ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या नेहमीप्रमाणे सुंदर दिसली.
- शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत या सोहळ्यात पोहोचला. तर करिश्मा कपूर, सनी लिओनी, दिशा पाटनी, तनिषा मुखर्जी, आदिति राव हैदरी, रिया चक्रवर्ती, सैयामी खेर, सूरज पंचोली, अक्षय कुमार, ईवलिन शर्मा आणि भूमी पेडनेकर या सेलिब्रिटींनीही सोहळ्याला चारचाँद लावले.  

पुढील स्लाईड्सवर बघा, व्होग ब्यूटी अवॉर्ड्स सोहळ्यात पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...