आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OOPS! When Deepika Called Ranbir ‘Bro’ At The Trailer Launch Of Tamasha

\'तमाशा\'च्या ट्रेलर लाँचला दीपिकाने EX-बॉयफ्रेंड रणबीरला म्हटले \'BRO\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर आणि दीपिकाची कूल केमिस्ट्री. - Divya Marathi
रणबीर आणि दीपिकाची कूल केमिस्ट्री.

मुंबईः रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणने मंगळवारी मुंबईतील पीव्हीआरमध्ये त्यांच्या आगामी 'तमाशा' या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी दीपिका डिझायनर सलोनीने डिझाइन केलेला पोलका डॉट्सचा ब्लू मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. तर रणबीर ब्लू टीशर्ट आणि डेनिम्समध्ये नेहमीप्रमाणे हँडसम दिसला. इव्हेंटमध्ये बी टाऊनच्या या एक्स लव्हर्सची केमिस्ट्री लक्षवेधी ठरली. मात्र दीपिकाने रणबीरला 'ब्रो' (भाऊ) अशी हाक देऊन सर्वांना आश्चर्यचा मोठा धक्का दिला.
जेव्हा दीपिकाने रणबीरला म्हटले 'ब्रो'
सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार सोशल मेसेजेस 90 दिवस डिलीट करता येणार नाहीयेत. याविषयी एका पत्रकाराने रणबीर-दीपिकाला प्रश्न विचारला असता, रणबीरने नॉटी अंदाजात म्हटले, ''सर्वप्रथम डर्टी मेसेज येणे बंद व्हायला हवे. जर तुमच्याकडे एक बॉयफ्रेंड आहे, तर दुस-या व्यक्तीला मेसेज पाठवू नका. नाही तर उगाचच अडकाल.'' (हसताना)
रणबीरचे हे उत्तर ऐकून दीपिका कन्फ्युज झाली आणि ती म्हणाली, ''नाइस अॅडव्हाइज ब्रो.''
रणबीरचे बर्थडे प्लान्स आणि दीपिकाचे गिफ्ट
येत्या 28 सप्टेंबर रोजी रणबीर आपला 33 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने त्याने आपले बर्थडे प्लान्स शेअर केले. रणबीरने सांगितले. ''मी आपल्या वाढदिवशी कामावर आहे. वाढदिवशी काम करणे चांगले असते. मला बर्थडे सेलिब्रेशन पसंतन नाही. यादिवशी तुम्हाला सर्व अटेंशन मिळत असते. ते मला आवडत नाही.'' रणबीरचे उत्तर ऐकून दीपिकाने त्याला प्रश्न केला, की तुझा हा दिवस आम्ही कसा स्पेशल बनवू शकतो. यावर रणबीर म्हणाला, ''येथे उपस्थित सर्वजण माझ्यासाठी एक गाणं गाऊ शकतात.''
जेव्हा divyamarathi.com ने दीपिकाला रणबीरला तू काय स्पेशल गिफ्ट देणार? असा प्रश्न केला असता, ती म्हणाली, ''त्याच्याकडे सर्वकाही आहे. मी त्याला माझ्या शुभेच्छा देते.''
या इव्हेंटमध्ये रणबीर आणि दीपिकासह दिग्दर्शक इम्तियाज अली, निर्माते साजिद नाडियाडवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर उपस्थित होते. येत्या 27 नोव्हेंबर रोजी 'तमाशा' थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढे पाहा, 'तमाशा'च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये क्लिक झालेला रणबीर-दीपिकाचा खास अंदाज...