आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Padmavati Deepika Padukone Hosts Party: Shah Rukh Khan Ranveer Singh And Jhanvi In Attend

दीपिकाच्या पार्टीत पोहोचले रणवीर-SRK, सारा-जान्हवीसोबत दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोणच्या पार्टीत जान्हवी कपूर, सारा खान आणि रणवीर सिंह - Divya Marathi
दीपिका पादुकोणच्या पार्टीत जान्हवी कपूर, सारा खान आणि रणवीर सिंह
मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग स्टारर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. अलीकडेच दीपिकाने चित्रपटाचे शूटिंग रॅपअप झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील राहत्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रणवीर सिंगने आवर्जुन हजेरी लावली. यावेळी तो पद्मावतीमधील लूकमध्ये दिसले. शाहिद कपूर मात्र पार्टीत अनुपस्थित होता. 

पार्टीत दिसला स्टार किड्सचा जलवा...
- दीपिकाच्या पार्टीत स्टार किड्स लाइमलाइटमध्ये होते. यावेळी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर पार्टीत पोहोचले.
- सारा लवकरच अभिषेक कपूर दिग्दर्शित आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर जान्हवी आणि ईशान सैराट या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत.

शाहरुख-गौरीसह पोहोचले हे सेलेब्स..
दीपिकाच्या पार्टीत शाहरुख खान पत्नी गौरीसोबत पोहोचला. याशिवाय करण जोहर, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट, कृती सेनन, सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीसह अनेक सेलिब्रिटी या पार्टीत दिसले. 

पुढील स्लाईड्सवर बघा, पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...