आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Cannes हून परतली ऐश्वर्या, आजोबांनी केले आराध्याचे लाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः माजी जगतसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा दरवर्षीप्रमाणे यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा पाहायला मिळाला. कान्समध्ये हजेरी लावून ऐश्वर्या शुक्रवारी रात्री मुंबईत परतली. मुंबई विमानतळावर मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या दिसली. या तिघींना घ्यायला ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय विमानतळावर पोहोचले होते. यावेळी कृष्णराज राय आपल्या लाडक्या नातीचे लाड करताना कॅमे-यात कैद झाले.
स्टाइल आयकॉन असलेल्या ऐश्वर्याचा यावेळी स्टायलिश अंदाज बघायला मिळाला. ब्लॅक जेगिंग्स आणि मॅचिंग ओव्हरकोटमध्ये ऐश्वर्या सुंदर दिसली. तर तिची लाडकी लेक आराध्या ब्लू डेनिम्स आणि पिंक कलरच्या कोटमध्ये क्युट दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुंबई विमानतळावर क्लिक झालेली ऐश्वर्या आणि आराध्याची खास छायाचित्रे...