आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phantom Trailer Launch: Saif Ali Khan Embarrassed Katrina Kaif

\'फँटम\' ट्रेलर लाँचवेळी कतरिना म्हणाली, \'माझा अद्याप साखरपुडा झालेला नाही\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फँटम'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये कतरिना कैफ आणि सैफ अली खान
मुंबई- शनिवारी (2 जुलै) दिग्दर्शक कबीर खानचा 'फँटम' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यानिमित्त कबीर खानशिवाय सिनेमाचे मुख्य कलाकार सैफ अली खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि निर्माता साजिद नाडियाडवालासुध्दा उपस्थित होते. लाँचिंग सेरेमनी जुहू (मुंबई) स्थित पीव्हीआरमध्ये आयोजित करण्यात आले होते. दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा 28 ऑगस्टला रिलीज होत आहे.
कतरिना म्हणाली, 'साखरपुडा झाला नाही'
'फँटम'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने कतरिनाला रणबीरसोबत साखरपुड्याविषयी विचारले. यावर कतरिनाने सांगितले, 'मी अद्याप साखरपुडा केलेला नाहीये आणि माझे लग्नाचेसुध्दा काहीच प्लानिंग नाहीये.'
वंडरफुल पर्सन आहे करीना- कतरिना
या इव्हेंटमध्ये कतरिनाला विचारले, की करीनाच्या नजरेत, कतरिना आणि रणबीर चांगले कपल आहे, यावर तुझे काय मत आहे?, ती म्हणाली, 'करीना वंडरफुल पर्सन आहे आणि तिच्यासोबत माझी चांगली बाँडिंग आहे.'
सैफच्या कमेंटवर लाजली कतरिना-
पत्रकारांनी करीनाच्या कमेंटवर तिचा पती सैफ अली खानचे मत विचारले, तेव्हा तो म्हणाला, 'हो, तो आमच्या घरी येऊन गेला आहे. रणबीर खूप नशीबवान आहे, त्याच्याकडे कतरिनासारखी गर्लफ्रेंड आहे.' सैफचे उत्तर ऐकून कतरिना लाजली. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, पत्रकार परिषद पूर्ण झाल्यानंतर कतरिना सैफ अलीला म्हणाली, की हे सर्व म्हणण्याची काय गरज होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फँटम' ट्रेलर लाँचिंग इव्हेंटचे फोटो...