आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PHOTOS: Abhishek Ignores Karishma In Shasi Kapoor's Dadasaheb Phalke Award Ceremony

PHOTOS: पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने करिश्माशी सामना होताच केला कानाडोळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये अभिषेक बच्चन, अरमान जैनशी हस्तोंदलन करताना. त्याच रांगेत करिश्मा कपूर आणि सैफ अली खानसुध्दा बसलेले आहेत)
मुंबई- प्रसिध्द अभिनेते शशी कपूर यांचा रविवारी (10 मे) हिंदी सिनेसृष्टीत सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित या सन्मान सोहळ्यात बी-टाऊनमधील अनेक दिग्गज आणि प्रसिध्द कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिषेक बच्चनसुध्दा या सोहळ्यात पोहोचला. येथे एक रंजक नजारा पाहायला मिळाला. या सोहळ्यात अभिषेक त्याची एक्स फियोन्सी करिश्मा कपूरकडे कानाडोळा करताना दिसला. वरील छायाचित्रात हे दृश्य स्पष्ट दिसून येत आहे. अभिषेक, अरमान जैन हस्तोंदलन करत असताना थोड्याच दूर करिश्मा कपूरसुध्दा बसलेली होती. परंतु त्याने तिच्याकडे पाहिलेदेखील नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला.
बॉलिवूडचे अनेक कलाकार शशी यांच्या सन्मान सोहळ्यात पोहोचले होते. अमिताभ बच्चनपासून हेमा मालिनी, रेखा, रणबीर कपूर वहीदा रहमान, आशा पारेख, जावेद अख्तर, शबाना आजमी, झीनम अमान, आशा भोसले, ऋषी कपूर, सैफ अली खानसारखे अनेक स्टार्स येथे उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शशी कपूर यांच्या सन्मान सोहळ्यातील Candid Photos...