आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बजरंगी...\'च्या स्क्रिनिंगला पोहोचल्या जॅकलिन-सोनाक्षी, सलमानची EX गर्लफ्रेंडही दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, जॅकलिन फर्नांडिस, सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान)

मुंबईः बॉलिवूडचा 'दंबग' सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या निमित्ताने त्याने आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी सोमवारी मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हासोबत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांनी हजेरी लावली होती.
मीडियाशी बोलताना सलमान म्हणाला, की सिनेमाची पहिली प्रिंट ही फॅमिली मेंबर्सना दाखवण्यासाठी हे स्क्रिनिंग ठेवले आहे. याशिवाय लवकरच हा सिनेमा आमिर आणि शाहरुखला दाखवण्यासही इच्छूक असल्याचे सलमान म्हणाला.
'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगला सलमानच्या दोन्ही बहिणी आणि मेहुणे पोहोचले होते. अर्पिता खान आणि अलविरा खान त्यांचे पती आयुष शर्मा आणि अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत दिसल्या. फिल्ममेकर करण जोहर, दिग्दर्शक डेविड धवन, म्युझिक डायरेक्टर भूषण कुमार, निर्माती कृषिका लुल्ला, अभिनेता पुलकित सम्राट, दिग्दर्शक कबीर खानसह अनेक स्टार्स स्क्रिनिंगला उपस्थित होते.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 17 जुलै रोजी रिलीज होणार असून यामध्ये सलमानसह करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...