आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्क्रिनिंगला नव-यासोबत पोहोचली विद्या, मुलीचा चेहरा लपवताना दिसली उदिता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्रात विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, खाली मीडियापासून मुलीचा चेहरा लपवताना उदिता गोस्वामी)
मुंबईः अलीकडेच मुंबईतील एका थिएटरमध्ये आगामी 'हमारी अधुरी कहानी' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सिनेमातील लीड अॅक्ट्रेस विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत पोहोचली होती. स्क्रिनिंगला एक रंजक घटना घडली. यावेळी दिग्दर्शक मोहित सुरीची पत्नी आणि अभिनेत्री उदिता गोस्वामी आपल्या चार महिन्यांच्या मुलीचा चेहरा मीडियापासून लपवताना दिसली. वरील छायाचित्रात तुम्ही उदिताला हाताने मुलीचा चेहरा लपवताना बघू शकता.
'हमारी अधुरी कहानी'च्या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेता इमरान हाश्मी वडील अनवर हाश्मीसोबत दिसला. तर निर्माते-दिग्दर्शक महेश भट आणि दिग्दर्शक मोहित सुरीसुद्धा स्क्रिनिंगस्थळी दाखल झाले.
12 जून रोजी रिलीज होणा-या या सिनेमात विद्या बालन, इमरान हाश्मी आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'हमारी अधुरी कहानी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...