(ध्रुव मेहरा, निशिका लुल्ला, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन)
मुंबईः बॉलिवूडच्या प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांची लेक निशिका लुल्ला लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. यानिमित्ताने निशिकाच्या प्री-वेडिंग बॅशचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या सास-यांसोबत हजेरी लावली होती. येथे ऐश्वर्या रेड प्रिंटेड टॉप आणि ब्लॅक पँट्मध्ये दिसली. तर बिग बी अगदी साध्या लूकमध्ये दिसले.
पार्टीत बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नेहा धुपिया, सोनम चौहान, तमन्ना भाटीया, तनिषा मुखर्जी, जुही चावला, ईशा देओल, माही गिल, शमिता शेट्टीसह अनेक सेलेब्स निशिकाला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
नॅशनल अवॉर्ड विजेत्या असलेल्या नीता लुल्ला यांची कन्या निशिकाचे लग्न बिझनेसमन ध्रुव मेहरासोबत होणार असून येत्या 10 जून रोजी बँकॉक येथे दोघांचा शाही लग्नसोहळा रंगणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, निशिका-ध्रुवच्या प्री वेडिंग बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...