आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: TWMR च्या सक्सेस बॅशमध्ये कंगनासह दिसली संजय दत्तची पत्नी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री कंगना रनोट आणि मान्यता दत्त)
मुंबईः आनंद एल. राय दिग्दर्शित 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाने रिलीजच्या तीन आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर 129.01 कोटींचा व्यवसाय केला आहे. 22 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला समीक्षकांसोबत प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे.
या वर्षात 100 कोटींचा व्यवसाय करणारा 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा पहिला सिनेमा ठरला आहे. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी सिनेमाच्या टीमने एक पार्टी आयोजित केली होती. या सक्सेस बॅशमध्ये लीड अॅक्ट्रेस कंगना रनोटसोबत संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त दिसली.
यावेळी कंगना डिझायनर बिभू महापात्राच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने स्ट्रेपलेस टॉपसोबत बेबी पिंक कलरचा स्कर्ट कॅरी केला होता. या पार्टीतील आकर्षणाचे केंद्रबिंदू कंगनाच होती. या सिनेमातील लीड अॅक्टर आर. माधवन मात्र पार्टीत गैरहजर दिसला.
जाएद खान, फराह खान, मोहित मारवाह, मनस्वी ममगई, अमृता पुरी, शान, दिग्दर्शक आनंद एल. राय, निर्माती कृषिका लुल्लासह बरेच सेलेब्स या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'तनू वेड्स मनू रिटर्न्स'च्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...