आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : रितेश-जेनेलियाने बघितला 'तनू वेड्स...', स्क्रिनिंगला पोहोचले हे सेलब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून जेनेलिया डिसूजा, रितेश देखमुख, राज कुमार राव, दीया मिर्झा आणि सोहेल खान)
मुंबईः 22 मे रोजी रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग शुक्रवारी मुंबईतील लाइट बॉक्स थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत पोहोचला होता. यावेळी अभिनेता राज कुमार राव, सोहेल खान, दीया मिर्झासह अनेक सेलेब्ससुद्धा दिसले.
सिनेमात मुख्य भूमिका वठवणारा अभिनेता आर. माधवन पत्नी सरितासोबत स्क्रिनिंगस्थळी दाखल झाला. दिग्दर्शक आनंद एल राय, एजाज खान, जिम्मी शेरगिल, दीपिक डोबरियालसुद्धा सिनेमा बघायला पोहोचले होते. याशिवाय अभिनेत्री सोनल चौहान, अरबाज खान, सोनू निगम, निर्माती कृषिका लुल्ला, मंदिरा बेदी हे सेलिब्रिटीसुद्धा ही रोमँटिक कॉमेडी फिल्म एन्जॉय करताना दिसले.
'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमात आर. माधवनसह कंगना रनोट मेन लीडमध्ये आहे. सिनेमाला रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू' या सिनेमाचा सिक्वेल आहे. इरोज इंटरनॅशनल या बॅनरमध्ये तयार झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल. राय यांनी केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...