आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Kangana Ranaut & Imran Khan Launch 'Katti Batti' Trailer

PHOTOS: 'कट्टी बट्टी'च्या ट्रेलर लाँचला कंगनाचा ड्रेस सावरताना दिसला इमरान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर, अभिनेत्री कंगना रनोट आणि अभिनेता इमरान खान)
मुंबईः कंगना रनोट आणि इमरान खान स्टारर 'कट्टी बट्टी' या सिनेमाचा ट्रेलर रविवारी मुंबईत पीव्हीआर थिएटरमध्ये लाँच करण्यात आला. इव्हेंटमध्ये इमरान ग्रे सूटमध्ये दिसला. तर कंगनाने डिझायनर Delphine Manivetच्या यलो फूल स्कर्ट ड्रेसमध्ये दिसली. यावेळी मंचावर इमरान कंगनाचा ड्रेस सावरताना दिसला. वरील छायाचित्रात तुम्ही हे दृश्य बघू शकता. दिग्दर्शक निखिल आडवाणी आणि निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर इव्हेंटमध्ये उपस्थित होते. लाँचिंगवेळी इमरान खानने मीडियाशी अनेक गोष्टी शेअर केल्या.
'कट्टी बट्टी'ला इमरानने केले होते रिजेक्ट
गेल्या दीड वर्षांपासून सिनेमांपासून दूर असलेल्या इमरानने सांगितले, त्याने 'कट्टी बट्टी' सिनेमा नाकारला होता. तो म्हणाला, ''जेव्हा निखिल (सिनेमाचे दिग्दर्शक) माझ्याकडे या सिनेमाची कल्पना घेऊन आला, तेव्हा मी त्याला थेट नकार दिला होता.'' यावर निखिल म्हणाला, ''इमरानच्या या रिस्पॉन्समुळे मी निराश झालो होतो. मी त्याला स्क्रिप्ट ऐकायला बोलावले. नरेशन ऐकल्यानंतर इमरानने सिनेमात काम करण्यास होकार दिला.''
यापूर्वीही मिळाली होती कंगनासोबत काम करण्याची ऑफर
कंगनासोबत पहिल्यांदाच काम केल्याने इमरान एक्साइटेड आहे. विशेष म्हणजे इमरानला यापूर्वीही कंगनासोबत काम करण्यासाठी अनेक ऑफर मिळाल्या होत्या. इमरानने सांगितले, कंगना आणि माझी भेट एका मॅगझिन शूटदरम्यान झाली होती. तेव्हापासून आम्ही दोघे चांगले मित्र झालो. आम्हाला एकत्र काम करण्यासाठी ब-याच ऑफर आल्या होत्या. मात्र त्यापैकी काही प्रोजेक्ट कंगनाने तर काही मी नाकारले. त्यामुळे आमची जोडी एवढा काळ सिल्व्हर स्क्रिनवर तुम्हाला दिसली नाही.
प्रत्येक व्यक्ती जातो पत्नीच्या रोषाला सामोरे
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कंगना (पायल) इमरान (मॅडी)ला त्याच्या अनहायजेनिक सवयींसाठी रागवताना दिसते. 32 वर्षीय इमरानला जेव्हा विचारले गेले, की पत्नी अवंतिकाचा राग सहन करावा लागतो का? त्याचे उत्तर देताना तो म्हणाला, ''प्रत्येक व्यक्ती आठवड्यातून किमान एकदा तरी पत्नीच्या रागाला सामोरे जातोच.''
युटीव्ही मोशन पिक्चर्सच्या बॅनरमध्ये तयार झालेला आणि निखिल आडवाणी दिग्दर्शित 'कट्टी बट्टी' ही एक रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे. या सिनेमात इमरान आणि कंगना लिव्ह इन पार्टनर्सच्या रुपात दिसतील. येत्या 18 सप्टेंबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कट्टी बट्टी'च्या ट्रेलर लाँचची छायाचित्रे...