(नीता लुल्ला, हेमामालिनी, निशिका लुल्ला, ध्रुव मेहरा)
मुंबईः बॉलिवूडच्या प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांची लेक निशिका लुल्ला बुधवारी लग्नगाठीत अडकली. मुंबईतील इस्कॉन टेंपलमध्ये ध्रुव मेहरासोबत निशिका विवाहबद्ध झाली. निशिका-ध्रुवला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
लग्नात नीता लुल्ला त्यांचे पती श्याम लुल्लांसोबत दिसल्या. अभिनेत्री हेमामालिनी, ऐश्वर्या राय बच्चनचे आईवडील कृष्णाराज राय आणि वृंदा राय नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा द्यायला आले होते.
1 जून रोजी निशिका-ध्रुवच्या प्री वेडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्री वेडिंग बॅशमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन, नेहा धुपिया, सोनम चौहान, तमन्ना भाटिया, तनिषा मुखर्जी, जुही चावला, ईशा देओल, निमरत कौर, शमिता शेट्टीसह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, निशिका-ध्रुवच्या लग्नाची छायाचित्रे...