(अभिनेत्री कंगना रनोट आणि पत्नी सरिता बिरजेसोबत आर. माधवन)
मुंबई- 1 जून रोजी अभिनेता आर. माधवनने आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. 45 वा वाढदिवस आणि अलीकडेच रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स'ला मिळालेले यश हा दुहेरी आनंद साजरा करण्यासाठी माधवनने खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत माधवनच्या रिल आणि रिअल वाइफ हजर होत्या. रिल म्हणजे या सिनेमात पडद्यावर अभिनेत्री कंगना रनोटने माधवनच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर माधवनची रिअल पत्नी म्हणजे सरिता बिरजे आहे.
केक कापून पार्टीला सुरुवात झाली. पत्नी सरिता माधवनला केक भरवताना कॅमे-यात क्लिक झाली. माधवनच्या बर्थडे बॅशमध्ये कंगना डिझायनर Antonio Marras च्या पिंक गाउनमध्ये दिसली. कंगनाने 'तनू वेड्स मनू' आणि 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या दोन्ही सिनेमांमध्ये माधवनच्या ऑन स्क्रिन पत्नीची भूमिका वठवली आहे.
माधवनच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती. यामध्ये बिपाशा बसू, सुरवीन चावला, दीया मिर्झा, मंदिरा बेदी, शर्मन जोशी, बोमन इराणी या सेलेब्सचा समावेश होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, माधवनच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...