आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA : दीपिकाला इम्प्रेस करण्यात अर्जुन कपूर Fail तर रणबीर सिंह झाला Pass

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयफाच्या मंचावर अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण)
एन्टरटेन्मेंट डेस्कः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहेत. आयफाच्या सेटवर पुन्हा एकदा दोघांची क्युट केमिस्ट्री उपस्थितांना बघायला मिळाली. यावेळी रणवीरने दीपिकासमोर उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.
कुआलालंपुर येथे रंगलेल्या 16 व्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात दीपिकाला 'वुमेन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अवॉर्ड घेण्यासाठी दीपिका मंचावर पोहोचली. या अवॉर्ड सोहळ्याचे होस्ट रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यावेळी तेथे उपस्थित होते. मंचावर जशी दीपिकाची एन्ट्री झाली, तसे रणवीरने गुडघ्यावर बसून हृदयाच्या आकाराचे बलून तिला दिले.
वरील छायाचित्रात तुम्ही हे दृश्य बघू शकता. रणवीरचे हे क्यूट प्रपोजल बघून दीपिकाच्या चेह-यावर स्मितहास्य फुलले. दोघांच्या या परफेक्ट पिक्चरमध्ये अर्जुन कपूरसुद्धा दिसतोय. अर्जुनच्या हातात चार लाल गुलाबसुद्धा दिसत आहे. अर्जुनने दीपिकाला फुल देण्याआधीच रणवीरने तिला आपले हृदय दिले. उपस्थितांनी हे दृश्य डोळ्यांत साठवले.
5 ते 7 जूनदरम्यान मलेशियाची राजधानी असलेल्या कुआलालंपुर येथे आयफा अवॉर्ड सोहळा रंगला. यावेळी बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेसनी सोहळ्याला चारचाँद लावले. अवॉर्ड नाइटमध्ये हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूरसह अनेक सेलेब्सनी उपस्थितांना एन्टरटेन केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयफा 2015च्या सोहळ्याचे INSIDE PHOTOS...