आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सिनेमा बघून कंगनावर इम्प्रेस झाल्या रेखा, केले गालावर KISS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगना रनोट आणि रेखा)
एन्टरटेन्मेंट डेस्कः सोमवारी रात्री मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. सिनेमातील कंगनाचा अभिनय पाहून अभिनेत्री रेखा खूप आनंदी दिसल्या. त्यांनी तिच्या गालाचे चुंबन घेऊन आपला हा आनंद व्यक्त केला. रेखा कंगनाचे लाड करताना कॅमे-यात कैद झाल्या.
अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाली होती. सिनेमा बघून इम्प्रेस झालेल्या माधुरीने ट्विटरवर लिहिले, “Take a bow #KanganaRanaut! What a brilliant performance! Superb direction @aanandlrai and writing #HimanshuSharma.Fab star cast.#TWMReturns.”
माधुरी आणि रेखा यांच्यासह सलीम खान, हेलन, वहीदा रहमान, आशा पारेख, दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा सिनेमा 22 मे रोजी रिलीज झाला आहे. कंगना रनोट आणि आर. माधवन स्टारर या सिनेमाच्या रिलीजच्या चार दिवसांत तब्बल 47.05 कोटींचा व्यवसाय केला आहे.
पुढे पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...