आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PHOTOS: Sonakshi, Shahid, Arjun, Hrithik, Anil Have A Blast At IIFA 2015 Press Con

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा सर्वांसमोर टक लावून बघू लागली सोनाक्षी, चक्क मुलीसारखा लाजला हृतिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि सोनाक्षी सिन्हा)
मुंबईः हृतिक रोशन, शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर आणि अनिल कपूर हे स्टार्स अलीकडेच आयफा 2015 च्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी सर्व स्टार्स एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसले. इव्हेंटमध्ये सोनाक्षी खूप वेळ हृतिकला न्याहाळताना दिसली.
इव्हेंटमध्ये सोनाक्षी सिन्हा डिझायनर आनंद काबरच्या ब्लॅक शोल्डर ड्रॅप्ड ड्रेसमध्ये दिसली. तर हृतिक रोशन शर्ट आणि पँटसोबत ग्रे कोटमध्ये दिसला. शाहिद कपूर व्हाइट टी शर्ट, ग्रे जॅकेट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसला. अनिल कपूर ग्रे सूटमध्ये नेहमीप्रमाणेच हँडसम दिसले. तर अर्जुन कॅज्युअल लूकमध्ये दिसला.
पत्रकार परिषदेत एक आश्चर्यकारक घटना घडली. ती म्हजणे पत्रकारांशी बातचित करत असताना अचानक सोनाक्षीने असे काही केले ज्यामुळे हृतिक हैराण झाला. बॉलिवूडमध्ये 'ग्रीक गॉड' नावाने प्रसिद्ध असलेला हृतिक अचानक सरप्राइज झाला, जेव्हा त्याच्या शेजारी बसलेल्या सोनाक्षीने त्याला तिच्या डोळ्यात डोळे टाकून बघायला सांगितले. सोनाक्षी आपल्याकडे टक लावून बघतेय हे पाहून हृतिक चक्क एखाद्या मुलीसारखा लाजला.
तर गप्पागोष्टीत अर्जुनने हृतिकवर क्रश असल्याची कबुली दिली. अर्जुनने सांगितले, "माझे पूर्वीपासूनच हृतिकवर क्रश राहिले आहे. त्याने इंडस्ट्रीचे नाव उंचावले आहे. मी यावर्षी आयफाचे सूत्रसंचालन करणार आहे."
5 ते 7 जून या काळात मलेशियातील कुआलालंपुर येथे 16 वा आयफा सोहळा रंगणार आहे. अवॉर्ड नाइटला अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह होस्ट करणार आहे. तर हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर स्टेजवर आपला जलवा दाखवणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आयफा प्रेस मीटदरम्यान क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...