आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Special Screening Of \'Masaan\' With Delhi CM Kejriwal And Aamir Khan

आमिरने किरण तर केजरीवाल यांनी कुमार विश्वाससोबत पाहिला \'मसान\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किरण राव, आमिर खान, रिचा चढ्डा, कुमार विश्वास, अरविंद केजरीवाल आणि दिग्दर्शक नीरज घायवन)
मुंबई- दिग्दर्शक नीरज घायवन यांचा 'मसान' सिनेमा 24 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. तरीदेखील सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगचा सिलसिला अद्याप सुरुच आहे. शनिवारी (25 जुलै) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमसाठी सिनेमाची स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. तसेच रविवारी (26 जुलै) आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनीदेखील 'मसान'ची स्क्रिनिंग अटेंड केली.
अरविंद म्हणाले 'Must Watch'-
रिचा चढ्डा स्टारर 'मसान' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी कुमार विश्वास यांच्यासोबत पाहिला. या स्क्रिनिंगवळी मुख्य अभिनेत्री रिचा चढ्डादेखील दिग्दर्शक नीरज घायवनसोबत उपस्थित होती. सिनेमा पाहिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करून सांगितले, 'Just saw Masaan. Excellent movie. A must watch'.
किरणसोबत पोहोचला आमिर खान-
मुंबईच्या लाइटबॉक्स थिएटरमध्ये आमिर खानने रविवारी (26 जुलै) पत्नी किरण रावसोबत 'मसान' सिनेमा पाहिला. यावेळी नीरज घायवनसोबत रिचा चढ्डा आणि विक्की कौशलसुध्दा पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबईमध्ये झालेल्या 'मसान'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेले स्टार्स आणि दिग्गज...