आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: रणबीर कपूरच्या आई-आजीने पाहिला 'बॉम्बे वेलवेट', आईसोबत पोहोचला वरुण धवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून नीतू कपूर, करुणा धवन, कृष्णा राज कपूर, वरुण धवन)
मुंबईः बुधवारी रात्री मुंबईत आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला अभिनेता वरुण धवन आपल्या आईसोबत पोहोचला होता. रणबीर कपूर स्टारर या सिनेमाच्या स्क्रिनिंगला त्याची आजी कृष्णा राज कपूर आणि आई नीतू सिंग-कपूर यांनीही आपली उपस्थिती लावली होती. याशिवाय रणबीरची आत्या रीमा जैन आणि आतेभाऊ आदर जैन हे देखील दिसले.
मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये आयोजित या स्क्रिनिंगला अभिनेत्री मंदिरा बेदी पती राज कौशलसोबत पोहोचली होती. शिवाय अर्शद वारसी, रवीना टंडन, राजीव खंडेलवाल, दिग्दर्शक विकास बहल, निर्माता दिनेश विजनसह अनेक सेलेब्स येथे पोहोचले होते.
या स्क्रिनिंगला फंकी लूकमध्ये पोहोचलेल्या वरुण धवनने सिनेमा आणि कलाकारांचे तोंडभरुन कौतूक केले. सिनेमाविषयी त्याने ट्विट केले, "Bombay velvet is grand and chaotically beautiful. Superb performances. @karanjohar is the best debut this year he's outstanding!!!"
अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूरसह अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 15 मे रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...