आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिता खानच्या दीरासोबत लग्नगाठीत अडकली गौतम गंभीरची बहीण, पाहा Wedding Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा नातू आश्रय शर्मा आणि राधिका गंभीर हे दोघे नुकतेच विवाह बंधनात अडकलेत. यामुळे, आता अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर हे दोघे नातेवाईक बनलेत. कारण, नववधू राधिका गंभीर ही क्रिकेटर गौतम गंभीर याची चुलत बहीण आहे, तर आश्रय शर्मा हा आयुषचा मोठा भाऊ आहे. आयुष आणि सलमान खानची बहीण अर्पिता हे गेल्यावर्षी विवाह बंधनात अडकलेत. त्यामुळे, राधिका ही अर्पिताची जाऊबाई बनलीय. आश्रय हा ग्रामीण विकास मंत्री अनिल शर्मा यांचा मोठा मुलगा आहे.
आश्रय आणि राधिका यांच्या लग्नासाठी अनेक बडे नेते आणि अभिनेते उपस्थित होते. या लग्नासाठी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. तसेच खान कुटुंबातून सोहेल खानही या लग्नसाठी उपस्थित होता.

राधिकाच्या वडिलांचा आहे कारचा बिझनेस
गौतम गंभीरचे काका आणि राधिकांच्या वडिलांचा इम्पोर्टेड कार सेलचा बिझनेस आहे. राधिका लॉ ग्रॅज्युएट असून फॅशन ब्लॉगर आणि डिझायनरच्या रुपात काम करते. आश्रय शर्मासुद्धा बिझनेसमन अशून मंडी जिल्हा काँग्रेस कमेटीचा महासचिव आहे.
सिम्बॉयसिस कॉलेजमधून राधिकाने पूर्ण केले ग्रॅज्युएशन
गौतम गंभीरची बहीण राधिकाने दिल्लीतील सिम्बॉयसिस कॉलेजमधून लॉची पदवी प्राप्त केली आहे. गंभीर कुटुंबीयांचे शर्मा कुटुंबीयांसोबत जुने संबंध आहेत. आता हे संबंध नात्यात बदलले आहेत.
आश्रय हिमाचलमध्ये सांभाळतोय सलमानच्या एनजीओचे काम
हिमाचलमध्ये पार पडलेल्या अर्पिता आणि आयुषच्या रिसेप्शनमध्ये सलमान सहभागी झाला होता. यानिमित्ताने तो हिमाचलमधील मंडी शहरात आला होता. त्याची एक झलक बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. येथील पड्डल मैदानावर आयोजित कार्यक्रमात सलमानने या शहरासाठी काही करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमानने येथे बीईंग ह्युमन या संस्थेचे काम येथे सुरु केले आहे. या एनजीओचे काम हिमाचलमध्ये आश्रय सांभाळतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आश्रय-राधिकाच्या लग्नात क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...