आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pk Bash: Deepika, Big B And Many More Celebs Attend Party

\'PK\'ने चीनमध्ये कमावले 113 कोटी, सक्सेस पार्टीत पोहोचले अनेक बॉलिवूड स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः राजकुमार हिराणींच्या 'पीके' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही उत्तम बिझनेस केला. अलीकडेच चीनमध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने येथे 113 कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ 20 दिवसांत सिनेमाने एवढा बिझनेस केला आहे. त्यामुळे सिनेमाची टीम खूप आनंदी आहे. चीनमध्ये सिनेमाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकतीच एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती.
'पीके'च्या सक्सेस पार्टीत सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा, अनुष्का शर्मा, अमिताभ बच्चन, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अनिल कपूर, रितेश सिधवानी, बोमन इराणी, आयुष्मान खुराणा, आदिती राव हैदरी, इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त, सुशांत सिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, राकेश ओम प्रकाश, जॅकी श्रॉफ, मोनाली ठाकूर, शान, नील नितीन मुकेशसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
गेल्यावर्षी 19 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या आणि 85 कोटींचा निर्मिती खर्च असलेल्या 'पीके'ने जगभरात 740 कोटींचा व्यवसाय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'पीके'च्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...