आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R Madhvan With \'Saala Khadoos\' Team Introduces Real Life Boxer Ritika Singh

रिअल लाइफमध्ये बॉक्सर आहे \'...खडूस\' गर्ल, एका पंचने हलला माधवनचा दात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतिका सिंह, आर माधवन - Divya Marathi
ऋतिका सिंह, आर माधवन
मुंबई- 'साला खडूस' या आगामी सिनेमाचा निर्माता राजकुमार हिराणी आणि आर माधवनने (अभिनेतासुध्दा) सिनेमाची मुख्य अभिनेत्री ऋतिका सिंहला मीडियाशी इंट्रोड्यूस केले. मुंबईची राहणारी ऋतिका सिंह रिअल लाइफमध्येसुध्दा बॉक्सर आहे. याच कारणाने तिने सिनेमात बॉक्सरची भूमिका उत्कृष्ट पार पाडली.
जेव्हा माधवनला ऋतिकाने मारला बुक्का...
इव्हेंटदरम्यान ऋतिकाने सांगितले, की तिच्यासाठी रिअल फाइट आणि रील फाइटमध्ये फरक दाखवणे सर्वात कठिण होते. ती रिंगमध्ये उतरल्यानंतर रिअल फाइट करायची, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुखापत व्हायची. शूटिंगदरम्यान ऋतिकाचा एक बुक्का माधवनला लागला आणि त्याचा दात हलू लागला होता.
कोण आहे ऋतिका...
100 बॉक्सर्सच्या ऑडिशन आणि जवळपास 700 सामने पाहिल्यानंतर दिग्दर्शक सुधा कोंगरा आणि आर माधवनने ऋतिका सिंहला या सिनेमासाठी निवडले. मुंबईची राहणारी ऋतिका सिंहने राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग केली आहे. ती कराट्यात ब्लॅक बेल्ट असून मिक्स मार्शल आर्ट्ससुध्दा शिकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील फोटो...