आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Asked Shilpa, "Aap Mere Doosre Bachche Ki Maa Kab Banne Wali Ho?"

शिल्पाला तिच्या नव-याने विचारला खासगी प्रश्न, "माझ्या दुस-या बाळाची आई कधी होणार?"

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून) मनीष पॉल, मलायका अरोरा खान, डायरेक्टर फराह खान, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा - Divya Marathi
(डावीकडून) मनीष पॉल, मलायका अरोरा खान, डायरेक्टर फराह खान, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा
मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी बुधवारी वियान मोबाइल्स ही त्यांची नवीन मोबाइल कंपनी लाँच केली. शिल्पा-राजने या कंपनीचे नाव त्यांचा मुलगा वियान राज कुंद्राच्या नावावर ठेवले आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, दिग्दर्शक फराह खान, मलायका अरोरा खान आणि मनीष पॉल शिल्पा-राजला शुभेच्छा द्यायला आले होते.
राजचा प्रश्न ऐकून हैराण झाली शिल्पा
शिल्पाने स्टेजवर एन्ट्री घेताच, तिचा नवरा राज कुंद्राने तिला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकून ती हैराण झाली. पब्लिक इव्हेंटमध्ये राजने शिल्पाला विचारले, की ती त्यांच्या दुस-या मुलाची आई कधी होणारेय? शिल्पा या प्रश्नाचे उत्तर टाळताना दिसली.
जितेंद्र यांनी सांगितली आपली लव्ह स्टोरी
राज यांनी जितेंद्र यांना त्यांच्या गर्लफ्रेंड्स आणि लव्हस्टोरीविषयी विचारणा केली. जितेंद्र यांनी सांगितले, ''आमच्या काळात फोन नव्हते. टेलिग्रामच्या माध्यमातून आमचे बोलणे व्हायचे. मी माझ्या गर्लफ्रेंडला (शोभा कपूर ज्या त्यांच्या पत्नी आहेत.) टेलिग्रामवर आय लव्ह यू लिहून पाठवले. याचे उत्तर म्हणून शोभा यांनी 'झुठा' लिहून पाठवले होते.''
राज म्हणाले, फराह तीन नव्हे चार मुलांची आई
इव्हेंटमध्ये राज फराहची खिल्ली उडवताना दिसले. त्यांनी फराह तीन नव्हे तर चार मुलांची आई असल्याचे सांगितले. दिग्दर्शिका फराह खानची तिळी मुले आहेत. राज यांनी फराहचा पती शिरीष कुंदर जो तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षे लहान आहे त्याचा गमतीने फराहचा चौथा मुलगा म्हणून उल्लेख केला.
पुढे पाहा, इव्हेंटमध्ये क्लिक झालेली स्टार्सची झलक...