आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Celebrates His 33rd Birthday On The Sets Of 'Ae Dil Hai Mushkil'

सेटवर रणबीरने कापला केक, शाहरुखसह अनेक स्टार्सनी केले बर्थडे Wish

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ऐ दिल है मुश्किल'च्या सेटवर रणबीर कपूर - Divya Marathi
'ऐ दिल है मुश्किल'च्या सेटवर रणबीर कपूर

मुंबईः आज (28 सप्टेंबर) आपला 33 वा वाढदिवस साजरा करणारा अभिनेता रणबीर कपूरने आगामी 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले. रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे एक छायाचित्र दिग्दर्शक करण जोहरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. छायाचित्रासोबत त्याने कॅप्शन लिहिले, "#happybirthdayranbir#onset #aedilhaimushkil"
अलीकडेच शाहरुख खानने या सिनेमाच्या सेटवर कलाकारांची भेट घेतली. शाहरुखने रणबीर आणि करण जोहरसोबतच्या भेटीचे छायाचित्र शेअर करुन लिहिले, "Was a treat to watch Ranbir & Karan make their dream come alive. The kids loved it 2.Thx Aye Dil team hav a good one."
रणबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची आई नीतू सिंग यांनी दोन छायाचित्रे पोस्ट केली आहेत. रणबीरचे बालपणीचे छायाचित्र शेअर करुन त्यांनी लिहिले, Happy Birthday Rana !!! Wish u happiness n my blessings always !!! I have been sending all your msges to RK !!! He is very touched n thanks everyone"
नीतू यांनी शेअर केलेल्या दुस-या छायाचित्रात रणबीर आणि त्याची आई रीमा जैन दिसत आहे.
या छायाचित्रासह त्यांनी कॅप्शन लिहिले, "Birthday eve of my two favs !!! Rima n RK"
रणबीर सध्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. विशेष म्हणजे लंडनमध्येच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री कतरिना कैफ 'बार बार देखो' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. अर्थात रणबीर यंदाचा वाढदिवस त्याची लेडी लव्ह कतरिनासोबत सेलिब्रेट करणार हे नक्की...
पुढे पाहा, स्टार्सनी शेअर केलेली बर्थडे बॉय रणबीरची छायाचित्रे...